छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात 72 टक्के मतदान 

रायपूर – छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत आज पार पडलेल्या दुसऱ्या टप्प्यासाठी 71.93 टक्के मतदान झाले. दुस-या टप्प्यातील सर्वाधिक मतदान भटगाव, तर सर्वात कमी मतदान रायपूर उत्तर आणि दक्षिणमध्ये झाले. दोन्ही टप्प्यात एकूण सरासरी 74.17 टक्‍के मतदान झाले आहे.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती, मात्र त्यानंतरही मतदार रांगेत उभे होते. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. राज्यात पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या युवांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मोठ्या संख्येने मतदान केले. दुसऱ्या टप्प्यातील या निवडणुकीत 1,079 उमेदवार रिंगणात होते. राज्यभरात 19,336 केंद्रांवर मतदान पार पडले. 11 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात 12 नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीत 76 टक्‍क्‍यांहून अधिक मतदानाची नोंद झाली होती.

आजच्या मतदानादरम्यान अनेक ठिकाणी इव्हीएममध्ये गडबड झाल्याची तक्रार कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली. पी. एल. पुनिया यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस शिष्टमंडळाने दिल्लीत निवडणूक आयोगाला भेट दिली आणि छत्तीसगडमध्ये निवडणुकीदरम्यान इव्हीएमशी छेडछाडीची तक्रार केली. राज्यातील काही मतदान केंद्रावरील किरकोळ दुर्घटना वगळता मतदान शांततेत पार पडले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)