छत्तीसगडमध्ये तीन लाखांचे इनाम असलेली महिला नक्षली शरण

रायपूर (छत्तीसगड) – तीन लाख रुपयांचे इनाम असलेली महिला नक्षली पोलीसांना शरण आली आहे. बसंती नेताम उर्फ जानो नावाची 25 वर्षे वयाची महिला नक्षली आज पोलीसांना शरण आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. कोंडागाव जिल्हा पोलीसांकडे बसंती नेतामने शरणागती पत्करली.

नक्षलवाद्यांच्या पोकळ तत्त्वांना कंटाळून आपण शरणागती पत्करत असल्याचे तिने पोलीसांना सांगितल्याची माहिती कोंड़ागाव पोलीस ठाण्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेश्‍वर नाग यांनी दिली आहे. शरणागत नक्षलींच्या पुनर्वसनाच्या राज्य सरकारच्या योजनेने आपण प्रभावित झाल्याचेही तिने पोलीसांना सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेजारच्या नारायणपूर जिल्ह्यातील धौडाई येथील रहिवासी असलेली बसंती नेताम माओवाद्यांच्या बायनार नक्षली टोळीची सक्रिय सदस्य होती. तिला पकडण्यासाठी सरकारने 3 लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे.
सरकारी पुनर्वसन योजनेनुसार शरणागत नक्षलींना द्यावयाच्या सर्व सुविधा तिला देण्यात आल्याची माहिती महेश्‍वर नाग यांनी दिली आहे.

23 जून रोजी कोंडागाव जिल्हा पोलीसांना 3 लाखांचे इनाम असलेला माओवादी नक्षली डेप्युटी कमांडर शरण आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)