छत्तीसगडमध्ये जिल्हाधिकाऱ्याचे अपहरण करणाऱ्या नक्षलींचे आत्मसमर्पण

रायपूर (छत्तीसगड) – जिल्हाधिकाऱ्याचे अपहरण करणाऱ्या दोन नक्षलेंनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या दोन्ही नक्षलींवर 5-5 लाख रुपयांचे इनाम होते. सन 2012 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी ऍलेक्‍स पॉल मेनन यांचे या दोन नक्षलीनी अपहरण केल्यामुळे मोठीच खळबळ माजली होती. त्याखेरीज इतर अनेक मोठ्या प्रकरणात हे वॉंटेड होते.

मिळालेल्या माहितीनुसार रविंद्र उर्फ सन्ना आणि त्याची पत्नी रीना यांनी आज आत्मसमर्पण केले. जिल्हाधिकाऱ्यांचे अपहरण करण्याप्रमाणेच एसटीएफवर गोळीबार, 2010 मध्ये पोलीसदलावर हल्ला आदी अनेक प्रकरणात ते वॉंटेड होते. सन्ना नक्षल फ्रंट टीममध्ये होता, तर रीना हिडमा बटालियनमध्ये सामील होती. 2008 ते 2018 या काळात ते सक्रिय नक्षली होते. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मानंतर त्यांनी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या कार्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

21 एप्रिल 2012 रोजी सुकमाचे जिल्हाधिकारी ऍलेक्‍स पॉल मेनन यांचे त्यांनी अपहरण केले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या मुक्ततेसाठी नक्षलींनी रोख रकमेसह अनेक मागण्या केल्या होत्या. अखेर बीडी शर्मा आणि हरगोपाल ताडमेटला या दोन पत्रकारांनी जंगलातून जिल्हाधिकाऱ्यांना सोडवून आणले होते. सरकार आणि नक्षली यांच्यात त्यांच्या सुटकेसाठी समझोता झाल्याचे बोलले जात होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)