संग्रहित छायाचित्र.

रायपूर: छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यामध्ये पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये चार नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. यामध्ये एका नक्षली महिलेचाही समावेश आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून 350 किलोमीटर अंतरावर गुमियाबेडा गावाजवळच्या जंगलामध्ये दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जिल्हा राखीव दलाने माओवादी विरोधी कारवाई केली, असे नारायणपूरचे पोलिस अधिक्षक जितेंद्र शुक्‍ला यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

पोलिसांची कारवाई सुरू झाल्यावर अन्य नक्षलवाद्यांनी जवळच्या जंगलामध्ये पळ काढला. घटनास्थळी चार नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठा शस्त्रसाठा आढळून आला. या परिसरामध्ये नक्षलवाद्यांविरोधी मोहिम अजूनही सुरूच असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)