छत्तीसगडमधील चकमकीत नक्षलवादी ठार 

file photo
रायपुर: छत्तीसगड मधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. गुरूवारी रात्री सुकमा जिल्ह्यात पुसनर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात ही चकमक झाली. त्यावेळी तेथील जंगलात तपासणी मोहीम उरकून जिल्हा राखीव गार्डचे पोलिस मुख्यालयात परतत असताना त्यांची गाठ नक्षलवाद्यांच्या एका गटाशी पडली. त्यावेळी ही चकमक झाली. त्यावेळी हा नक्षलवादी ठार झाला.
त्याची ओळख पटली असून त्याचे नाव कवासी देवा असे आहे. तो माओवादी संघटनेचा चंदामेता भागाचा डेप्युटी कमांडंट होता. त्याच्या जवळ एक स्वयंचलीत बंदुक, बॉंम्ब तयार करण्याचे साहित्य, काही स्फोटके अशी सामग्री सापडली आहे. त्याचा मृतदेहही सुरक्षा जवानांनी ताब्यात घेतला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)