छत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान 

नवी दिल्ली: छत्तीसगडमधील विधानसभेच्या निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात 70 टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाच्यावतीने आज ही माहिती देण्यात आली. काही ठिकाणच्या मतदानाचे आकडे अद्याप उपलब्ध होणे बाकी असल्याने ही टक्केवारी आणखीन वाढण्याची शक्‍यता असल्याचे निवडणूक आयोगाचे वरिष्ठ उपायुक्‍त उमेश सिन्हा यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यामध्ये विधानसभेच्या 90 मतदारसंघांपैकी 18 ठिकाणी मतदान झाले होते. कोंडागाम येथे 61 टक्के, केशाल येथे 63, कंकर-62, बस्तर-58, दंतेवाडा- 49, खिरागड-71, दोंगारगड-71, दोंगारगाव-71 आणि खुजी या मतदारसंघात 72 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे.

दुसऱ्या टप्प्यामध्ये 72 मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि 11 डिसेंबर रोजी निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)