छत्तिसगढ विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी धरमलाल कौशिक 

रायपूर – छत्तिसगढ विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी भाजपने प्रदेशाध्यक्ष धरमलाल कौशिक यांना पसंती दर्शवली. त्यांची शुक्रवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. कौशिक 2008 ते 2013 या कालावधीत विधानसभेचे सभापती होते.

सलग पंधरा वर्षे छत्तिसगढच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या रमण सिंह यांना विरोधी पक्षनेते बनवले जाणार नसल्याचे संकेत भाजपमधून आधीच मिळत होते. त्या राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने घवघवीत यश मिळवताना भाजपची पंधरा वर्षांची राजवट उलथवून टाकली. दरम्यान, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते चरणदास महंत यांची विधानसभेच्या सभापतीपदी निवड करण्यात आली. चारवेळा विधानसभेवर आणि तीनवेळा लोकसभेवर निवडून जाण्याची कामगिरी त्यांनी केली आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)