छत्तिसगढ निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार समाप्त 

रायपूर – छत्तिसगढ विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार शनिवारी सायंकाळी समाप्त झाला. या टप्प्यात विधानसभेच्या 18 जागांसाठी 12 नोव्हेंबरला (सोमवार) मतदान होईल.  पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार प्रामुख्याने नक्षलवादाच्या मुद्‌द्‌याभोवती फिरला. त्यातच प्रचाराच्या काळात माओवादी नक्षलवाद्यांनी सुमारे अर्धा डझन हल्ले घडवले. पहिल्या टप्प्यात मतदानाला सामोरे जाणारे मतदारसंघ 8 नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये विखुरले आहेत.

या टप्प्यात मुख्यमंत्री रमण सिंह यांच्यासह एकूण 190 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य 31 लाख 79 हजार 520 मतदार ठरवतील. छत्तिसगढच्या सत्तेसाठी भाजप आणि कॉंग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये थेट लढत अनुभवयास मिळते. मात्र, यावेळी जनता कॉंग्रेस छत्तिसगढ आणि बसप युतीने आणखी चुरस वाढवली आहे. मागील निवडणुकीत 18 पैकी 12 मतदारसंघांमध्ये सत्तारूढ भाजपचा पराभव झाला होता. त्यामुळे यावेळी काय घडणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. छत्तिसगढमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. त्यातील 72 जागांसाठी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)