छत्तिसगढमध्ये 8 नक्षलवाद्यांचा खात्मा ; 2 पोलीस शहीद 

रायपूर – छत्तिसगढमध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 8 नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकीत 2 पोलीस शहीद झाले. सुकमा जिल्ह्यातील जंगलात ती चकमक झडली. संबंधित ठिकाण तेलंगण राज्याच्या सीमेजवळ आहे. त्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली.

त्या मोहिमेवेळी सुरक्षा जवान आणि नक्षलवादी आमनेसामने आल्याने त्यांच्यात चकमक झडली. त्यामध्ये डिस्ट्रिक्‍ट रिझर्व्ह गार्डचे दोन पोलीस मृत्युमुखी पडले. चकमकीची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षाबळ पाठवण्यात आले. चकमक झडलेल्या जंगलात आणखी नक्षलवादी दडल्याची शक्‍यता असल्याने त्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांची मोहीम उशीरापर्यंत सुरू होती. एकाच वेळी 8 नक्षलवाद्यांचा खातमा हे सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)