छत्तिसगढमध्ये मागील वेळेपेक्षा एक टक्‍क्‍याने कमी मतदान 

नवी दिल्ली – छत्तिसगढ विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मिळून 76.35 टक्के इतके भरघोस मतदान झाले. मात्र, ते मागील वेळेपेक्षा एक टक्‍क्‍याने कमीच आहे. छत्तिसगढमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. त्यासाठी 12 आणि 20 नोव्हेंबरला अनुक्रमे 76.39 आणि 76.34 टक्के मतदानाची नोंद झाली.

मागील वेळी (2013) त्या राज्यात 77.40 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यावेळी 1.05 टक्‍क्‍याने मतदान कमी झाले. दरम्यान, छत्तिसगढमध्ये यावेळी एकूण 1 हजार 269 उमेदवार त्यांचे नशीब आजमावत आहेत. त्यांच्या भवितव्याचा फैसला 11 डिसेंबरच्या मतमोजणीने होईल. छत्तिसगढमध्ये सलग 15 वर्षांपासून भाजप सत्तेवर आहे.

-Ads-

यावेळी त्या पक्षाला कॉंग्रेसकडून कडवी लढत दिली जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या नेतृत्वाखालील जनता कॉंग्रेस छत्तिसगढ, बसप आणि भाकप या पक्षांच्या आघाडीमुळे त्या राज्यात तिरंगी लढत अपेक्षित आहे. त्या राज्यात सत्ताबदल होणार की भाजप सत्ता राखणार याबाबत मोठी उत्सुकता आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)