छत्तिसगढमध्ये तब्बल 60 नक्षलवादी शरण

संग्रहित छायाचित्र.

रायपूर – छत्तिसगढमध्ये आज तब्बल 60 नक्षलवादी पोलिसांपुढे शरण आले. ही घडामोड नक्षलवादी संघटनांसाठी मोठा हादरा मानली जात आहे. शरण आलेल्या नक्षलवाद्यांनी नारायणपूर जिल्ह्यात पोलीस आणि आयटीबीपीच्या अधिकाऱ्यांपुढे त्यांची शस्त्रास्त्रे खाली ठेवली.

शरण आलेले बहुतांश नक्षलवादी कनिष्ठ पातळीवरील असले तरी त्यांच्या कृतीने संबंधित परिसरातील नक्षलवाद्यांचे ग्राऊंड नेटवर्क पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये 20 महिलांचा समावेश आहे. नक्षली विचारसरणी आणि हिंसाचाराबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. शरण आलेल्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी छत्तिसगढ सरकारने विशिष्ट योजना जाहीर केली आहे. त्याचा लाभ आज शरण आलेल्यांना मिळेल, असे सरकारी सुत्रांनी स्पष्ट केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)