रायपूर – भारतीय प्रशासकीय सेवेतून (आयएएस) निवृत्त झालेल्या छत्तिसगढ केडरच्या दोन अधिकाऱ्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्जिअस मिंज आणि आर.पी.एस.त्यागी हे ते निवृत्त अधिकारी आहेत. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष भुपेश बाघेल आणि पक्षाचे प्रभारी पी.एल.पुनिया यांच्या उपस्थितीत झालेल्या वेगवेगळ्या सोहळ्यांत मिंज आणि त्यागी यांनी त्या पक्षात प्रवेश केला. ते दोघेही कॉंग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवतील, अशी शक्‍यता आहे.

छत्तिसगढमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. यापार्श्‍वभूमीवर, मिंज आणि त्यागी यांचा प्रवेश कॉंग्रेसला उभारी देणारा आहे. काही दिवसांपूूर्वीच आयएएस अधिकारी ओ.पी.चौधरी यांनी सरकारी सेवेचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्या राज्यात नोकरशहांचे राजकारणात सक्रिय होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)