“छठपूजे’साठी हनुमान मित्र मंडळातर्फे घाटाची स्वच्छता

चिंचवड – रविवारपासून चार दिवसीय छठ व्रतास प्रारंभ झाला आहे. रविवारी नहाय खाय, सोमवारी खरना, मंगळवारी आणि बुधवारी पाण्यात उभे राहून सुर्यास अर्घ्य देण्यात येणार आहे. नदी किंवा जलाशयात उभे राहून सुर्यास अर्घ्य देणे हा छठ व्रताचा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याने चिंचवड येथील पवना नदीवरील घाटाची हनुमान मित्र मंडळ छठ पूजा समितीच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. समितीच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार मंगळवार (दि.13)रोजी सायंकाळी आणि बुधवारी (दि.14) सकाळी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहर प्रमुख राहुल कलाटे, जिल्हाप्रमुख योगेश बाबर, नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे, सुलभा उबाळे, विभागप्रमुख विशाल यादव, अमित बाबर आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समितीच्या वतीने विजय गुप्ता यांनी दिली


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)