छगन भुजबळ यांनी संभाजी भिडेंवर साधला निशाणा

पुणे: छगन भुजबळ यांनी संभाजी भिडेंवर निशाणा साधला. देशात मनुवाद वाढवण्याचे काम चालू असून माझ्या बागेतील आंबे खा म्हणजे तुम्हाला मुले होतील असा प्रचार केला जात आहे. यातून कोणते विचार समाजात रुजवण्याचे काम केले जात आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला.

ते पुढे म्हणाले की, आम्ही काही दहा हजार कोटी किंवा पाच हजार कोटी महात्मा फुले स्मारकासाठी मागत नाही. तर काही लाख रुपये मागत असून तसे झाल्यास स्मारक अधिक चांगले प्रकारे होईल. महात्मा फुलेवाडा हे माझे ऊर्जा केंद्र असल्याचे त्यांनी नमूद केले.

-Ads-

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले यांच्या 128 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित समता दिन कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी छगन भुजबळ बोलत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)