छगन भुजबळ यांच्यासह कुटुंबीयांना तूर्त दिलासा

ईडी न्यायालयात 6 सप्टेंबरला सुनावणी
मुंबई – महाराष्ट्र सदनासह अनेक गैरव्यवहारांप्रकरणी मनी लॉडरिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पुरवणी आरोपपत्रात ईडीने नव्याने गुन्हा दाखल केल्याने पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि समिर भुजबळसह त्यांच्या कुटुबियांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने मनी लॉंडरिंग प्रकरणात तूर्तास दिलासा दिला आहे. न्यायालयाने या सर्वांना वैयक्तीक हमीवर तात्पुरता जामीन मंजूर करताना ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावर 6 सप्टेंबरपर्यंत सुनावणी तहकूब ठेवली.

ईडीने भुजबळ आणि त्याच्या कुटूंबियांविरोधात मनी लॉडरिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर भुजबळ यांची नाशिक येथील 25 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त करून त्याआधारे नव्याने पुरवणी आरोपपत्र दाखल करून नव्याने गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे. त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी भुजबळ यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्यांच्या वकीलांनी न्यायालयाला दिली.

-Ads-

ईडीने पुरवणी आरोपपत्राबरोबर स्वतंत्र गुन्हा दाखल केल्याने भुजबळ यांच्या वतीने जोरदार आक्षेप घेण्यात आला. ईडीने हे पुरवणी आरोपपत्र दाखल केले असून त्याचा विचार स्वतंत्र गुन्हा असा करता येणार नाही, असा दावा करून अशा प्रकारे एकाच गुन्ह्यात दोनदा अटक करता येणार नाही. ती कायद्याच्या मूलभूत तत्वाची पायमल्ली होईल, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याची दखल घेऊन न्यायालयाने पुढील सुनावणी 6 सप्टेंबरला निश्‍चित करताना भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांना वैयक्तीक हमीवर तात्पुरता जामीन मंजूर केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)