छगन भुजबळ यांची ट्विटरवर एंट्री

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर उद्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी ट्विटरवर एंट्री केली आहे. पहिलंवहिलं ट्वीट करत त्यांनी कार्यकर्त्यांशी आपण लवकरच संवाद साधणार असल्याचं म्हटलं आहे.

”माझ्या बांधवांनो आणि माता भगिनींनो,माझ्यावर विश्वास व्यक्त करून आपण मला नेहमीच साथ दिली,त्यामुळे मी आपला आभारी आहे,देशाच्या कानाकोपऱ्यातून आपण मला भेटण्यासाठी उत्सुक आहात,याची मला कल्पना आहे.माझ्यावरील वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर मी आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधायला येणार आहे,” असे ट्वीट भुजबळांनी केले आहे. @ChhaganCBhujbal या नावाने भुजबळांचे ट्विटर हँडल आहे. ट्विटरवर त्यांनी आतापर्यंत कुणालाही फॉलो केलेले नाही.

-Ads-

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)