छगन भुजबळांना हायकोर्टाचा दिलासा

न्यायालयाच्या पुर्वपरवानगीशिवाय देशात कोठेही जाण्यास परवानगी
मुंबई – महाराष्ट्र सदनासह अनेक गैरव्यवहारांप्रकरणी मनी लॉडरिंग कायद्यांतर्गत जामीनावर सुटलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. जामीन मंजूर करताना न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय मुंबई बाहेर जाण्यास घालण्यात आलेली अट उच्च न्यायालयाने शिथील केली.

भुजबळ यांना मुंबईच काय महाराष्ट्राह देशात कोठेही जाण्यास मुभा दिली आहे. मात्र महाराष्ट्राच्या बाहेर जाताना त्यांना तपास अधिकाऱ्यांना आपल्या वास्तव्याचा ठावठिकाणा कळवणे बंधनकारक राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
मनी लॉंडरिंग कायद्यांतर्गत 14 मार्च 2016 रोजी भुजबळ यांना अटक करण्यात आली. त्यानंतर 4 मे 2018 रोजी प्रदिर्घ कालावधीनंतर उच्च न्यायालयाने जामीनावर सुटका करताना मुंबईबाहेर जाताना न्यायालयाची पुर्व परवानगी घेण्याची अट घातली होती. ही अट शिथील करावी म्हणून उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर आज सुनावणी झाली.

यावेळी भुजबळ यांच्या वतीने युक्‍तीवाद करताना भुजबळ हे आमदार तसेच लोकप्रतिनिधी असल्याने आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्यासाठी सतत मुंबईबाहेर जावे लागते. महात्मा फुले समता परिषदेचे सदस्य असल्याने या परीषदेच्या कामासाठी राज्याबाहेरही जावे लागते. तसेच आपातकालीन परिस्थितीत बाहेर जाण्याची वेळ येऊ शकते. अशा वेळी वारंवार न्यायालयाची परवानगी घेणे अडचणीचे होते.

यापूर्वी जामीन मिळाल्यानंतर आठ वेळी न्यायालयाची परवानगी घेण्यात आली होती. याकडे लक्ष वेधताना या प्रकरणी अटक होण्यापूर्वी परदेशात होते आणि त्यांच्या विरोधात कारवाई सुरु आहे, याची माहिती असतानाही देशात परतले आहे. याची आठवण करून देताना कायदेशीर प्रक्रियेपासून पळून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावा केला.
याला ईडीने विरोध केला. भुजबळ यांची राज्याबाहेरही मालमत्ता आहे. त्यांच्या विरोधात खटला सुरु असताना ते राज्याबाहेर पूर्वपरवानगी न घेता गेल्यास खटल्याला ते प्रभावित करु शकतात, अशी भिती व्यक्त केली.

मात्र न्यायालयाने भुजबळ यांच्या दावा मान्य करून देशात पूर्वपरवानगीशिवाय कोठेही प्रवास करण्यास मान्यता दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)