चौफुला-सुपा मार्गावरील अपघातात तरुणाचा मृत्यू

यवत- चौफुला-सुपा मार्गावर देऊळगाव गाडा (ता. दौंड) गावच्या हद्दीत टेम्पोची दुचाकीला समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी (दि. 4) सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात हर्षद शांताराम मुळीक (वय 21, रा. पिसे, ता. पुरंदर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हर्षद आणि त्याचा मित्र दुचाकीवरून (क्र. एमएच 14 ईजी 6085) चौफुलाकडून सुप्याकडे जात होते. टेम्पो (क्र. एमएच 12 एफसी 0088) वरील चालक सुप्याकडून चौफुल्याकडे जात होता. यावेळी ही दोन्ही वाहने देऊळगाव गाडा (ता. दौंड) गावच्या हद्दीत आली असता टेम्पोच्या चालकाने दुचाकीला समोरून जोराची धडक दिली.
या धडकेत दुचाकीवर मागे बसलेला हर्षद मुळीक हा तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला, तर दुचाकी चालक ज्ञानदेव शिंदकर लांब फेकला गेल्यामुळे बचावला. टेम्पो चालकाविरोधात हर्षद याचा भाऊ विराज मुळीक यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार यवत पोलिसांनी टेम्पो चालक सुरेश दासा लोंढे (रा. उरुळी देवाची, होळकरवाडी, ता. हवेली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा अधिक तपास यवत पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)