चौथ्या फेरीत 9 हजार प्रवेश पूर्ण

अजुनही 20 हजार विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतिक्षेत
प्रभात वृत्तसेवा
पुणे – अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या चौथ्या फेरीत 9 हजार 224 विद्यर्थ्यांनी प्रवेश घेतला असून अजुनही 20 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. अकरावी प्रवेशाच्या चार
फेऱ्या पूर्ण झाल्या असून पाचव्या विशेष फेरीचे अर्ज भरणे सध्या सुरु आहे.
अकरावी केंद्रीय प्रवेश समितीकडून शुक्रवारी चौथ्या फेरीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी प्रसिध्द करण्यात आली आहे. मागील फेरीच्या तुलनेत चौथ्या फेरीत मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतले गेले आहेत. या फेरीतील 18 हजार 5 विद्यार्थ्यांना महाविद्यालय वाटप करण्यात आले होते. त्यापैकी निम्म्या म्हणजेच 9 हजार 224 विद्यार्थ्यांनी पूर्ण शुल्क देत प्रवेश घेतला आहे. तिसऱ्या फेरीअखेर 30 हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर होते तर चौथ्या फेरीनंतर अजुनही 20 हजार विद्यार्थी प्रवेशाबाहेर असल्याचे दिसत आहे. पाचव्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी 16 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. तसेच 18 व 19 ऑगस्ट रोजी या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. प्रवेश समितीने रिक्त जागांचा तपशील आणि कट ऑफची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. याचा विचार करून विद्यार्थ्यांनी 13 ऑगस्ट पर्यंत दहा पसंतीक्रम भरायचे आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)