चौथ्या तिमाहीत ऍक्‍सिस बॅंकेला 2189 कोटींचा तोटा

नवी दिल्ली -अक्‍सिस बॅंकेच्या अनुत्पादन मालमत्तेत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बॅंकेला मोठ्या प्रमाणात तरतूद करावी लागली आहे. त्याचा परिणाम बॅंकेच्या ताळेबंदावर झाला आहे. चौथ्या तिमाहीत बॅंकेला 2189 कोटी रुपयांच्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. बॅंकेला प्रथमच तोटा झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बॅंकेला 1225 कोटी रुपयाचा नफा झाला होता.

या तिमाहीत बॅंकेला खराब कर्जापोटी तब्बल 7179 कोटी रुपयाची तरतूद करावी लागली आहे. जी की गेल्या वर्षी 2581 कोटी रुपये एवढी होती. बॅंकेच्या वार्षिक ताळेबंदावरही परिणाम झाला असून सरलेल्या वर्षात बॅंकेचा नफा 92 टक्‍क्‍यांनी कमी होऊन तो केवळ 275 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी बॅंकेला 3679 कोटी रुपयाचा नफा झाला होता.

-Ads-

वर्षाअखेर बॅंकेचे एनपीए 6.77 टक्‍क्‍यावर गेले आहे. जे की गेल्या वर्षी 5.04 टक्‍के इतके होते. शेअर बाजारात आज बॅंकेच्या शेअरच्या भावात 0.77 टक्‍के इतकी घट झाली. बॅंकेची अनुत्पादक मालमत्ता वाढत असल्याबद्दल रिझर्व्ह बॅंकेने वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे व सुधारणा करण्यास सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)