चौथ्या कसोटीत इंग्लंडची घसरगुंडी 

चहापानापर्यंत पहिल्या डावांत 6 बाद 101
साऊथहॅम्पटन, दि. 30 – मालिकेवर वर्चस्व गाजविणाऱ्या भारताच्या वेगवान गोलंदाजांनी पुन्हा एकदा प्रभावी मारा करताना इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजविले. त्यामुळे आज सुरू झालेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडची पहिल्या डावांत घसरगुंडी झाली. चहापानाला खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या 6 बाद 101 धावा झाल्या होत्या. या वेैळी मोईन अली नाबाद 14 धावांवर, तर सॅम करन नाबाद 6 धावांवर खेळत होते.

पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला केवळ 31 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला डावाने पराभूत केले आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. परंतु भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात 203 धावांनी बाजी मारताना पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत झुंजार पुनरागमन केले व आपली पिछाडीही 1-2 अशी कमी केली. चौथा कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची भारताला संधी आहे.
त्याआधी आज सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश व खिलाडू खेळपट्टी पाहून इंग्लंडने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारताच्या वेगवान गोलंदाजांनी अचूक मारा करताना इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडविली. जसप्रीत बुमराहने कीटन जेनिंग्जला शून्यावर पायचित करून इंग्लंडच्या घसरगुंडीची सुरुवात केली. पाठोपाठ ईशांतने जो रूटला (4) बाद करीत भारताला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. बुमराहने बेअरस्टोला (6) तर पांड्याने कूकला (17) बाद करीत इंग्लंडची 4 बाद 36 अशी अवस्था केली.

बेन स्टोक्‍स (23) व जोस बटलर (21) यांनी पाचव्या विकेटसाठी 33 धावांची भर घातली. महंमद शमीने बटलर व स्टोक्‍स यांना बाद करीत इंग्लंडची 6 बाद 86 अशी घशरगुंडी घडवून आणली. परंतु सॅम करन व मोईन अली यांनी पुन्हा एकदा इंग्लंडचा डाव सावरला. भारताकडून बुमराह व शमी यांनी 2-2 बळी घेतले. तर ईशांत व पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी घेत त्यांना साथ दिली.

संक्षिप्त धावफलक-
इंग्लंड- पहिला डाव- 6 बाद 101 (बेन स्टोक्‍स 23, जोस बटलर 21, ऍलिस्टर कूक 17, मोईन अली नाबाद 14, सॅम करन नाबाद 6, जसप्रीत बुमराह 24-2, महंमद शमी 34-2, ईशांत शर्मा 11-1, हार्दिक पांड्या 22-1)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)