चौथे शिवाजी महाराज यांची स्मृती नगरकरांना ऊर्जा देणारी- आसिफ खान 

 हुतात्मा चौथे शिवाजी महाराज यांना अभिवादन

नगर: चौथे शिवाजी महाराज हे देशप्रेम व रयत प्रेमाचे अति उच्च उदाहरण आहे. इंग्रजी राजवटीत देशातील इतर संस्थान इंग्रजांशी सलगी करत होती, त्यावेळी कोल्हापूर संस्थान हे इंग्रजविरोधी विद्रोहाचे केंद्र होते. येथे अनेक क्रांतिकारी निर्माण झाले होते. कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज हे त्याकाळी पडलेल्या दुष्काळात दिवस रात्र झटुन रयतेची काळजी घेत होते. त्यांचे आपल्या देशावर व रयतेवर अत्यंत प्रेम होते. या प्रेमापायीच इंग्रज सरकार व त्याचे दलालांनी चौथे शिवाजी महाराज यांचा छळ करून अहमदनगरच्या किल्ल्‌यात हत्या केली. त्यांच्या स्मृती या अहमदनगरकरांना अखंड उर्जा देणारे आहे, असे प्रतिपादन इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ खान दुलेखान यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अस्मिता विद्यार्थी संघटना, अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळ, मखदूम सोसायटी, कामगार संघटना महासंघ आणि क्रांतिसिंह कामगार संघटनांच्या वतीने हुतात्मा चौथे शिवाजी महाराज यांचा स्मृतीदिन अभिवादन करण्यात आला. यावेळी इंजिनिअर अभिजित वाघ, प्राध्यापक डॉक्‍टर महेबूब सय्यद, निखिल शिंदे, रेहान शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी यशवंत तोडमल यांनी कष्टकरी विद्यार्थी यांनी चौथ्या शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन वाटचाल करण्याचे आवाहन केले. विविध मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कामगार संघटना महासंघ व क्रांतिसिंह कामगार संघटनेच्या कॉम्रेड भैरवनाथ वाकळे यांनी अहमदनगरकरांनी खरया इतिहासा सोबत राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास सुरज सावंत, दत्ताभाऊ वडवणी कर, विजय केदारे ,संतोष गायकवाड, दत्ता देशमुख, उषा सोनवणे, विवेक मोरे, उदय थिटे, फिरोज शेख, सोमेश सोनवणे, विवेक मोरे, आबिद दुलेखान आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)