चौथे फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन 24 व 25 रोजी

सातारा – फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, अनंतराव थोपटे महाविद्यालय, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र साहित्य परिषद, गंगूताई पंतसचिव वाचनालय व समविचारी संस्था-संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 24 व रविवार दि. 25 रोजी भोर येथे छ. शिवाजी विद्यालय व गर्ल्स हायसकूलच्या प्रांगणावर, चौथे फुले शाहु आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दि. 24 रोजी दु. 12 वा. ध्वजारोहण व संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. उद्‌घाटन महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ट विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ग्रंथदालन उद्‌घाटन सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते तर ग्रंथप्रदर्शनं उद्‌घाटन सामाजिक कार्यकर्ते महादेव इंगळे यांच्या हस्ते होणार आहे. दु.2 वा. शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त, समाजपरिवर्तनात शिक्षक व शिक्षण संस्थाचे योगदानया विषयावर परिसंवाद होणार आहे.

-Ads-

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास विचारवंत अरुण कांबळे व डॉ. कुमार सप्तर्षी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी बापूजी साळुंखे यांना मरणोत्तर गौरवपत्र प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यानाही गौरविण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वा. कविसंमेलन होणार आहे.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते रविवार दि. 25 रोजी सकाळी 10.30 वा. उद्‌घाटन करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थान विचारवंत डॉ. रजिया पटेल भूषावणार आहेत. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अरुण बुरांडे, कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव, स्वागताध्यक्ष आ.संग्राम थोपटे, बडोदा-91 वे अ.भा. सा.संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्र. कुलगुरू एन एस उमराणी,विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)