चौकीदार कितीही अंधार असला तरी, चोरांना पकडण्याची हिंमत ठेवतो- नरेंद्र मोदी

आग्रा: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आग्रा दौऱ्यावर असून, त्यांनी अनेक नवीन योजनांचे उदघाट्न केले. यावेळी गंगा प्रकल्पासाठी ४ हजार करोड रुपये किमतीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. दरम्यान, मोदींनी जनसभा घेत राफेल, जि एस टी,आरक्षण आणि आग्रा स्मार्ट सिटी अश्या महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली.

मोदींनी आपल्या भाषणातून विरोधकांवर चांगलीच फटकेबाजी केली. ते म्हणाले, “जे लोकं एकमेकांचे तोंड पाहायला तयार नाही ते, चौकीदारला बाजूला काढण्यासाठी एकत्र येत आहे. मात्र हा चौकीदार न घाबरता आणि थांबता पूर्ण इमानदारीने आपले काम चालू ठेवणार आहे. आणि मला कोणी विकत देखील घेऊ शकत नाही हा चौकीदार कितीही अंधार असला तरी, चोरांना पकडण्याची हिंमत ठेवतो”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी मोदींनी आम्ही आग्रा शहराचा विकास करून त्याला चांगली स्मार्ट सिटी करू, गरज पडली तर यासाठी जपान कडून मदत घेऊ, असे विधान केले. यावेळी मोदींनी आयुषमान भारत योजनेवर भाष्य केले, या योजने अंतर्गत संपूर्ण देशातील किमान १०,००० गरीब नागरिक उपचार करू शकतात असल्याचे मोदी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)