चौकाला भगवान महावीरांचे नाव

भोसरी – भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त आळंदी रोड, संत तुकारामनगर येथील चौकाचे भगवान महावीर चौक असे नामकरण भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

भोसरी गावठाण ते राम स्मृती लॉन्स दरम्यान अहिंसा रॅली काढण्यात आली. यावेळी शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, दत्ता गव्हाणे, राहुल गव्हाणे, कामगार नेते सचिन लांडगे, जैन संघटनेचे अध्यक्ष सुभाष चत्तुर, मुकेश ओसवाल, सागर सांकला तसेच जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांना थंड पेय वाटप करण्यात आले.

आमदार महेश लांडगे म्हणाले, भगवान महावीरांनी जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली. त्यांनी अहिंसेला मानवाचा उच्चतम नैतिक गुण मानला. त्यांनी जैन धर्माची अहिंसा, सत्य, अपरिग्रह, अस्तेय आणि ब्रह्मचर्य ही पंचशील तत्वे सांगितली. त्यांनी आपल्या जीवनात उपदेश आणि प्रवचनांच्या माध्यमातून जगाला मानव कल्याणाची योग्य दिशा दाखवली. त्यांनी दिलेला अंहिसेचा संदेश आचारण्यात आणण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)