पिंपरी- चौकाचौकात वाहतूक नियम धाब्यावर

संग्रहित छायाचित्र........

पिंपरी – उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील चौका-चौकात खुलेआम वाहतूक नियम धाब्यावर बसवण्यात येत असल्याने प्रशस्त रस्ते असूनही वाहतुकीचा खेळखंडोबा होत आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील प्रत्येक चौकात वाहतूक नियम मोटार चालकांकडून धाब्यावर बसवण्यात येत असून, त्याकडे वाहतूक पोलिसांकडून पुर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. तर, काही ठिकाणी पोलीसच वाहतूक नियम मोडत असल्याचे चित्र आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर भक्ती-शक्ती, आकुर्डी, चिंचवड, मोरवाडी, पिंपरी, नाशिकफाटा आदी मुख्य चौक असून सर्वच चौकात हीच परिस्थिती असून वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. एकीकडे वाहतुकीला शिस्त लागावी व अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरीता हेल्मेट सक्तीसारखे कडक नियम राबवले जात असताना, चौका-चौकात झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट, उलट दिशेने वाहन चालवणे सर्रास सुरु असून त्याकडे वाहतूक पोलीस “गांधारी’च्या भूमिकेत आहे. यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी चौक, चिंचवड चौकातील सिग्नल दिवे हे बऱ्याचवेळा काही कारणाने बंद असतात. तेव्हा, तर सर्वच बेशिस्त वाहतूक सुरु असल्याचे सर्व शहरवासीयांना पहायला मिळते. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिसांकडून कुठल्याही प्रकारे वाहतुकीचे नियमन केले जात नाही. यामुळे नुसते महसूल गोळा करण्यापुरतेच वाहतूक नियम आहेत का? असा सवाल नागरिक करत आहेत.

पोलिसांकडूनच नियम धाब्यावर
सामान्य नागरिकांकडून वाहतूक नियमाचे उल्लंघन झाल्यास त्याला दंड भरावा लागतो. मात्र, वाहतूक पोलिसच नियमांचे पालन करत नसल्यास त्यांना कोण दंड मागणार? असेच चित्र चिंचवड चौकातील सिग्नलवर पहायला मिळाले. सिग्नल पडल्यावर सर्व नागरिक “झेब्रा क्रॉसिंग’च्या मागे थांबले होते. मात्र, तेवढ्यात दोन वाहतूक पोलीस आले आणि “झेब्रा क्रॉसिंग’च्या पुढे आपली मोटारसायकल लावली. कायद्याच्या रक्षणकर्त्यांचा थाट पाहून अन्य नागरिक आवाक्‌ झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)