चौंडी गदारोळप्रकरणी 16 जणांना जामीन

29 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सुटका

बारामती – चौंडी (जि. अहमदनगर) येथे अहल्यादेवी जयंतीच्या कार्यक्रमात धनगर समाज आरक्षणाची मागणी करीत दगडफेक करुन गदारोळ केल्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांच्यासह इतर 16 जणांचा अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (गुरुवारी) जामीन मंजूर केला आहे. यात बारामतीतील 6 जणांचा समावेश आहे. 29 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणातील प्रमूख समजले जाणारे डॉ. इंद्रकुमार भिसे यांचा जामीन मात्र नामंजुर करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चौंडी येथे मंत्री राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे उत्सावाचे आयोजन दि. 31 मे रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकासभेच्या सभापती सुमित्रा महाजन होत्या. कार्यक्रम सुरू असतानाच धनगर समाज आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीचे पडसाद उमटले. राज्यातून आलेल्या वेगवेगळ्या संघटनांनी याबाबत आवाज उठवला. धनगर समाजातील राज्यातील नेत्यांपैकी एक मानले जाणारे मंत्री राम शिंदे यांच्या भाषणाच्यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत आरक्षणाची मागणी केली. तर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. राष्ट्रवादीचे युवकचे प्रदेशउपाध्यक्ष किशोर मासाळ व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री शिंदे यांना आरक्षण केव्हा लागू होणार याचा जाब विचारत घोषणाबाजी केली होती. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी देखील कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. असे असले तरी संतप्त कार्यकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष करीत गदारोळ सुरुच ठेवला होता. तर यावेळी झालेल्या दगडफेकीत सुरक्षाव्यवस्थेसाठी तैनात असलेला एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे किशोर मासाळ, डॉ. इंद्रकुमार भिसे, तसेच सुरेश कांबळे यांच्यास शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक केली, तर जामखेड पोलीस ठाण्यात या सर्व
कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. घटना घडून 29 दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर आज अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. जगताप यांच्या समोर चाललेल्या खटल्यात 16 जाणांचा जामीन मंजूर करण्यात आला. गुन्ह्याच्या स्वरुपानुसार काही कार्येकर्त्यांचा जामीन यापर्वी वेगवेगळ्या न्यायालयात मंजूर झाला आहे.

न्यायालयाचे म्हणणे…
खटल्यामधील सर्वांत गंभीर स्वरुपाचे समजले जाणारे कलम 307 हे आरोपींच्या बाबतीत लगू होत नाही. आरोपींनी दगड मारलेला नाही. हे फिर्यादीवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे आरोपींना अटकेत ठेवता येणार नाही. गुन्ह्यात वापरलेला दगड यापूर्वीच हस्तगत केला आहे, असा युक्‍तीवाद आरोपींच्या वकिलांनी यावेळी केला. ऍड. अक्षय महाडीक, ऍड. अमर महाडीक, ऍड. प्रसाद खारतूडे, ऍड. अमोल सातकर तसेच ऍड. प्रिया महाडीक यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)