चौंडीतील विकासकामांना गती द्या- पालकमंत्री

नगर: पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असणाऱ्या जामखेड तालुक्‍यातील चौंडी येथे होत असलेल्या विविध विकासकामांचा आढावा पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, माजी मंत्री अण्णा डांगे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे उपस्थिते होते.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ येथील म्युझयिम बांधकाम, गढीजवळ आणि घाटाजवळ संरक्षक भिंत बांधणे, शिवमंदिर संरक्षक भिंत मजबुतीकरण आणि बळकटीकरण, गढी परिसरातील रस्ता तयार करणे आदींसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. याशिवाय, प्रस्तावित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबतही यावेळी चर्चा झाली. या तीर्थक्षेत्र विकासासाठी 25 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात सुरूवातीला आवश्‍यक बाबींना तात्काळ मंजुरी घेऊन काम सुरू होतील, हे पाहा, अशा सूचना पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी केल्या. परिपूर्ण प्रस्तावासह आणि पर्यटकांना येथे आल्यानंतर खऱ्या अर्थाने समाधान होईल, अशा पद्धतीने याठिकाणी म्युझियम असावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

तीर्थक्षेत्र विकासासाठी 25 कोटींचा आराखडा तयार होणार


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)