चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेतील पहिले मीटर औंधमध्ये

पुणे – अखेर चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेतील मीटर बसवण्याच्या कामाला महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरुवात झाली असून, औंधमध्ये 12 कमर्शियल मीटर बसवण्यात आले आहेत. वर्षभरात एक लाख मीटर बसवण्याचे महापालिकेचे उद्दीष्ट आहे.

समान पाणीपुरवठा योजनेसाठी शहरात सुमारे 1700 किमीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. तसेच रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचेही काम सुरू झाले आहे. ज्या ठिकाणी कॉंक्रीटीकरणाचे काम करण्यात येणार आहे तेथे त्याच कामाच्या वेळी पाण्याच्या वाहिन्या टाकण्याचेही काम करण्यात येणार आहेत. औंधमध्ये याच माध्यमातून काम करण्यात आले असून, पाणी रिडींगचे 12 मीटर बसवण्यात आले आहेत. यातील पहिले मीटर औंधमधील सारस्वत बॅंकेच्या कम्पाउंडच्या आत बसवण्यात आले आहे.

समान पाणीपुरवठा योजना ही सुरुवातीपासूनच गाजत आहे. पाणी पुरवठ्याच्या निविदा, पाणीमीटरची निविदा, पाणीसाठवण टाक्‍या, यापासून ते कर्जरोखे, कर्जरोख्यांची रक्‍कम वापरली नाही अशा एक ना अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश होता. अखेर ही सगळी कामे मार्गी लागली असून, मीटर बसवण्याच्या प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. मीटर जोडणीही पूर्ण झाली असून, आता रिडींगनुसार पाणीपट्टी आकारणीला सुरुवात होणार आहे.

जेथे जेथे जलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यात येईल, त्याठिकाणी मीटर बसवण्याचे कामही पूर्ण करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. सध्या औंधमध्ये हे काम सुरू आहे. काही दिवसांनी विमाननगर येथे कामाला सुरुवात होणार आहे. कामांच्या नियोजनात कमर्शियल मीटर आधी बसवण्यात येणार असून, त्याबरोबरच घरगुती कनेक्‍शन्सही जोडण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

वर्षभरात एक लाख मीटर बसवण्याचे उद्दीष्ट असले तरी, महापालिकेकडे सद्यस्थितीत 40 हजार मीटर उपलब्ध आहेत. वर्षभरात आणखी 60 हजार मीटर उपलब्ध करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)