चोविस तासात आरोपी जेरबंद

पिंपरी – दोन लाखांची रोकड बॅंकेत भरायला जात असताना नागरिकाची बॅग चोरट्यांनी हिसकावून नेली होती. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी चोरांना अवघ्या 24 तासाच्या आत जेरबंद केले.

सुजित भरत बोराडे (वय-20 रा. विठ्ठलनगर, पिंपरी) व सूरज उर्फ डिप्शा महादेव गायकवाड (वय-21, रा. फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी) व अक्षय भिमशी देवकर (वय-22, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून या प्रकरणी अंकुश दत्तु बामणे (वय-39, रा. डांगे चौक, थेरगाव) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे स्पाईन रोड येथील टेल्को कंपनीचा ब्रीज उतरून बॅंकेत दोन लाख रुपये भरण्यासाठी गुरुवारी (दि. 30) जात होते. यावेळी सुजित व सूरज हे तोंडाला रुमाल बांधून ऍक्‍टीव्हा गाडीवरून आले व त्यांनी फिर्यादी यांची बॅग हिसकावून नेली. याप्रकरणी फिर्यादी यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे व पोलीस निरीक्षक गुन्हे सतीष नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने संशयावरून आरोपींना जेरबंद केले.

यावेळी पोलिसांनी आरोपीचा साथीदार अक्षय याला देखील अटक केली आहे. यावेळी त्याच्या जवळून पोलिसांनी 1 लाख 83 हजार रुपये, सॅमसंगचा फोन 13 हजार रुपये मोबाईल व चोरीतील ऍक्‍टीव्हा गाडी असा एकूण 2 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)