चोर पकडल्यावर भाजपा खासदाराच आले अडचणीत

भाजपा खासदार म्हणतो 50 हजाराची चोरी, चोर म्हणतो 1.14 कोटी चोरले

पाटणा (बिहार) – भाजपा खासदारांनी चोरीची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी पाटण्यात एका चोराला अटक केली. मात्र पोलिसांनी चोराला पकडल्याने गिरिराह सिंह आणि त्यांचा पक्ष, दोघांचीही पंचाईत झाली आहे. कारण गिरिराज सिंह यांनी सुमारे 50 हजार रुपये आणि काही दागिन्यांची चोरी झाल्याचे सांगितले होते, तर पकडलेल्या चोराकडे 1 कोटी 14 लाख रुपये, 600 अमेरिकन डॉलर्स, दोन सोनसाखळ्या, एयरिंग्ज, सोन्याचे लॉकेट, तीन अंगठ्या, 14 चांदीची नाणी, 7 लक्‍झरी वॉचेस एवढा मुद्देमाल सापडला आहे आणि तो गिरिराज सिंह यांच्या पश्‍चिम पाटण्याच्या बोरिंग रोडवरील घरातून चोरल्याचे त्याने कबूल केले आहे.

उलटपक्षी गिरिराज यांनी तक्रार नोंदवतना छोटी रक्कम आणि काही दागिन्यांची चोरी झाल्याचे म्हटले होते. मंगळवारी रात्रीपर्यंत खासदार वा त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे या मुद्देमालावर आपला अधिकार सांगितलेला नव्हता.

जोपर्यंत खासदार स्वत: हा मुद्देमाल आपला आहे असे म्हणत नाहीत, तोपर्यंत तो त्यांचा आहे असे म्हणता येणार नाही, असे भाजपाने म्हटले आहे. आयकर विभागाने या रकमेचा तपास सुरू केलेला आहे. ज्याअर्थी गिरिराज सिंह यांनी 50,000 रुपये आणि काही दागिन्यांची चोरी झाल्याचे सांगितले आहे, त्या अर्थी ते खरे असले पाहिजे. या मुद्देमालाचा मालक शोधणे हे पोलिसांचे काम असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे यांनी सांगितले

खासदार बनण्यापूर्वी गिरिराज सिंग आमदार होते आणि त्यांनी पाटणा आणि बेगसराई येथील प्रॉपर्टीसह आपली संपत्ती 75 लाख रुपये असल्याचे निवेदन दिले होते. नितीश कुमारांच्या युती सरकारमध्ये ते पशुसंवर्धन मंत्री होते.

आपल्याकडे इतक्‍या मोठ्या रकमेचे चोरी झाल्याचे गिरिराज सिंह यांनी म्हटले नसले, तरी आपण त्यांच्याच घरातून त्यांचा बॉडीगार्ड रूपकमल, पहारेकरी धीरेंद्र आणि नोकर लक्ष्मण यांच्या मदतीने चोरी केल्याचे त्याने कबूल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनू महाराज यांनी सांगितले, पोलिसांनी या सर्वांना अटक केलेली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)