चोरी प्रकरणी पोलीस कोठडी

पुणे – दुचाकीच्या डिकीत ठेवलेली 12 हजार 500 रूपयांची रोकड चोरून नेल्याप्रकरणी एकाला डेक्कन पोलिसांनी अटक केली. त्याला 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. प्रवीण उर्फ पप्पू नंदू जागडे (वय 32, रा. कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

विक्रम पवार (वय 36, रा. गोखलेनगर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ही घटना 1 मे 2017 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कमला नेहरू पार्क परिसरात घडली. विक्रम पवार यांनी दुचाकी पार्क केली होती. त्याच्या डिकीत 12 हजार 500 रूपयांची रोकड असलेली पर्स होती. डिकी उघडून त्यातील रोकड लांबविण्यात आली होती. याप्रकरणी प्रवीण जागडे याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील रक्कम जप्त करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकिलांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने जागडे याला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)