पुणे : चोरी प्रकरणात सराईताला पोलीस कोठडी

पुणे- मोबाईल आणि ज्वेलर्स दुकानात 1 लाख 70 हजार रुपयांची चोरी केल्याप्रकरणी आणखी एकाला खडक पोलिसांनी अटक केली. त्याला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
रोहित दीपक सातपुते (वय 21, रा. कर्वेनगर) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी अक्षय शंकर कांबळे (वय 19, रा. हरकानगर, भवानी पेठ) याला अटक करण्यात आली आहे. तो न्यायालयीन कोठडीत आहे. ही घटना 1 जानेवारी रोजी पहाटे 3.45 च्या सुमारास गुरूवार पेठ येथील चाईस कम्युनिकेशन नावाच्या मोबाईल दुकानात आणि मौर्य ज्वेलर्स गोल्ड सिल्वर डिव्हिजन दुकानामध्ये घडली. याबाबत हर्षद गुंदेचा (वय 28, रा. गुरूवार पेठ) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. दोन्ही दुकानातील चोरीतून 1 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सातपुते याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी सातपुते सराईत आहे. त्याच्यावर शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये तब्बल 15 गुन्हे दाखल आहेत. याबाबत अधिक तपास करण्यासाठी सातपुते याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. खडक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड अधिक तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)