चोरी प्रकरणात दोघांना पोलीस कोठडी

पुणे – रो हाऊसमधील लहान मुलांच्या शाळेतील लॅपटॉप, मोबाईलसह रोख रक्कमेची चोरी केल्याप्रकरणात दोघांना चतृ:श्रृंगी पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच.आर.जाधव यांनी दिला आहे.
अमर तात्याराव बडे (वय 23, रा. देहूगाव, मूळ. चाडगाव, ता. रेणापूर, जि. लातुर) आणि घनश्‍याम नानासो घोलप (वय 23, रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती, मूळ. आनंदनगर, रास्तेवाडी, ता. बारामती) अशी पोलीस कोठडे झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 34 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना बाणेर, धनकुड वस्ती येथील जी.टू.किडस, डेफो डिल्स स्कुल, रो हाऊस येथे 20 मार्च रोजी रात्री 8.30 ते 21 मार्च रोजी सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील लॅपटॉप, मोबाईल जप्त करण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील चैत्राली पणशीकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)