…चोरी पुण्यात अन्‌ विक्री फलटणमध्ये

अट्टल चोरटे एलसीबीच्या जाळ्यात; दुचाकीसह मोबाईल केला हस्तगत

सातारा,दि.24(प्रतिनिधी)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्यात चोरलेल्या दुचाकी व मोबाईल विक्रीसाठी आलेल्या चोरट्यांना पोलिसांनी फलटणमध्ये अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. अक्षय बाळासाहेब वावरे (रा.माळेगाव,ता.बारामती) किरण भिमदेव लकडे (रा.पणदरे,ता. बारामती) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन दुचाकी व एक मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

जिल्ह्यात दुचाकी चोरांनी धुमाकूळ घातल्याने, जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी चोरांच्या मुसक्‍या आवळण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड हे फलटण तालुक्‍यातील गोखळीफाटा या परिसरात गस्त घालत होते. दरम्यान दोन युवक संशयास्पद फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्यांना थांबवत, त्यांच्याकडील दुचाकीची कागदपत्रे दाखवण्याची सुचना केली. मात्र त्या दोन युवकांनी कागदपत्रे नसल्याचे कबुल केल्याने पोलिसांचा सशंय बळावला.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा ताब्यातील दुचाकी पुणे जिल्ह्यातून चोरल्याची त्यांनी कबुली दिली. संशयीतांनी दुचाकी या पुणे जिल्ह्यातील माळेगाव येथून तर मोबाईल जेजुरी परिसरातून चोरल्याची कबुली दिली. चोरलेली दुचाकी व मोबाईल फलटण परिसरात विक्रीसाठी आल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. दोन्ही संशयीत हे पोलिस रेकॉर्डवरील दुचाकी चोर असल्याने पुढील तपासकामी त्यांना बारामती ग्रामीण पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड,पोलिस हवालदार आनंदराव भोईटे, पोलिस नाईक विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, विक्रम पिसाळ, संजय जाधव,विजय सावंत यानी केली.
कऱ्हाड शहरातील घरफोड्यांचा छडा लावल्यानंतर एलसीबीने आता दुचाकी चोरांच्याही मुसक्‍या आवळल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)