“चोरीला’ गेलेल्या जागेचा शोध सुरू

संग्रहित छायाचित्र

उरुळी कांचन, दि. 17 (वार्ताहर) – बोरी भडक (ता. दौंड) चंदनवाडी येथील गट नंबर 191/3 मधील शाळेच्या “चोरीला’ गेलेल्या एक गुंठा जागेचा शोध सुरू असून कागदपत्रांबाबत पंचायत समिती तसेच संबंधीत विभागांकडे अर्ज केला आहे. कागदपत्रे मिळाल्यानंतर सदर जागेबाबत अर्जदार सोमनाथ शिंदे यांना माहिती दिली जाईल, असे सरपंच बाबुराव गजेशीव यांनी सांगितले.
याबाबत माहिती अशी की, बोरी भडक (चंदनवाडी) येथील गट नंबर 191/3 मधील एक गुंठे जागा ही सोमनाथ शिंदे यांच्या वडीलांनी शाळेकरिता बक्षिसपत्र करून दिली होती. ही जागा कोठे आहे. याबाबत सोमनाथ शिंदे यांनी ग्रामपंचायतीकडे माहिती मागविली असता त्यानंतर सदर जागेचा शोध लागलाच नाही. त्यामुळे या जागेवर शाळा बांधावी किंवा ती परत मिळावी यारिता शिंदे यांनी अनेक वेळा ग्रामपंचायत शालेय समिती व पंचायत समितीकडे अनेक वेळा अर्ज केला, त्यानंतर त्यांना स्मरणपत्र देण्यात आले. मात्र, ग्रामपंचायतीने याबाबत अद्यापही कोणत्याही कार्यवाही केली नसल्याने नागरिकांतही नाराजी निर्माण झाली आहे. जागा शोधून तेथे शाळा बांधा किंवा जागा परत द्या, अशी मागणी शिंदे यांनी केली असून याबाबत लवकर निर्णय झाला नाही तर उपोषण करू, असा इशारा सोमनाथ शिंदे यांनी दिला आहे.
चंदनवाडी येथील मुलांकरिता शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता एक गुंठा जागा गावातील ज्येष्ठ व्यक्ती जागा देते तसेच शाळेला मंजुरी मिळते, तशी नोंदही कागदोपत्रीही आहे. परंतु, प्रत्यक्षात जागाही नाही आणि शाळाही नाही. यामुळे ग्रामपंचायतीच्या या कारभाराबाबत नागरिकांतूनही तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

  • शाळेच्या जागेसंदर्भातील सर्व कागदपत्रे पाहिली आहेत. ज्या जागेचा उल्लेख आहे तेथे शाळा नाही. याबाबतची माहिती घेण्याकरिता संबंधीतांना सूचना केल्या आहेत. येणाऱ्या मासिक बैठकीत हा विषयाबाबत निर्णय घेवू.
    – मिलींद कमलाकर केंज, ग्रामसेवक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)