चोरीप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

पुणे – गोडाऊनमध्ये ठेवलेले 2 लाख 50 हजार 200 रुपये किंमतीचे पार्टीकल बोर्ड चोरल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलिसांनी या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 17 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

इरफान तुराब मुलाणी (वय 24, रा. पिसोळी, मूळ रा. सोलापूर) आणि भाऊसाहेब आप्पा शिंदे (वय 26, रा. हवेली, मूळ रा. अहमदनगर), अशी पोलीस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी दीपक लिलाचंदन ओसवाल (वय 43, रा. सॅलसबरी पार्क) यांनी कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या पिसोळी येथे असलेल्या गोडाऊनमध्ये 10 मार्च आणि त्यापूर्वी वेळोवेळी ही चोरी करण्यात आली होती.

आरोपींनी गोडाऊनमधील 2 लाख 50 हजार 200 रुपये किंमतीचे 403 पार्टीकल बोर्ड चोरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)