चोरीच्या पाच गुन्ह्यात परप्रांतीय व्यक्तीला सक्तमजुरी

पुणे- विमाननगर परिसरात पाच ठिकाणी चोरी करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीला पाच गुन्ह्यात प्रत्येकी 1 वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. थोडगे यांनी हा आदेश दिला आहे.
छवेंद्रकुमार परमुलाल मरावी (वय 24, रा. लेबर कॅम्प, विमाननगर, मुळ रा. मध्यप्रदेश) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. मरावी यांच्या विरुद्ध विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये चोरीच्या पाच तक्रारी दाखल झाल्या होता. त्यात मरावी याने मोबाइल, लॅपटॉप, चार्चर, टीव्ही, स्पीकर, मिक्‍सर, घड्याळ, दारांचे पडदे, बॅग आणि ड्रीलमशीन असा सुमारे 1 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरला होता. कोणी नसल्याचे पाहून मरावी घरात घुसायचा. मैल्यवान वस्तु चोरून नेत असत. या पाच प्रकरणांमध्ये न्यायालयाने दोषी ठरवत मौरवी याला शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी पाहिले. त्यांनी 10 साक्षीदार तपासले. त्याना न्यायालयीन कामासाठी सहायक पोलीस फौजदार एस. एन. बांगाळे, पोलीस हवालदार जी.बी. भोर अणि महिला पोलीस शिपाई जी.पी. गावडे यांनी मदत केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)