चोरीच्या ट्रकचा दोन दिवसांतच छडा

कर्जत तालुक्‍यात आरोपी अटकेत : बारामती ग्रामीण पोलिसांची कामगिरी

भवानीनगर- बारामती तांबेनगर एमआयडीसीमधून चोरी गेलेला ट्रक बारामती ग्रामीण पोलिसांकडून अवघ्या दोन दिवसांत नगर जिल्ह्यातील कर्जत येथून आरोपीसह ताब्यात घेतला. बारडगाव सुद्रिक (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथे ही कारवाई करण्यात आली. तानाजी हनुमंत खैरे, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. खैरे याला ताब्यात घेऊन बारामती न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बारामती ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अगोती नं. 2 (ता. इंदापूर) येथील दिगंबर पांडुरंग काळे यांचा ट्रक (क्रमांक एमएच 12- एचडी.5054) हा बारामती येथील तांबेनगर येथून (दि.30) रोजी चोरट्याने पळविला होता. याबाबत बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पत्रे, पोलीस हवालदार रमेश साळुंके, पोलीस कॉन्स्टेबल रविराज जाधव यांनी याप्रकरणी तपास सुरू केली. तपासात आरोपीचे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्याचा ठावठिकाणा पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर बारामती पोलिसांचे पथक नगर जिल्ह्यात पोहचले. रविवार (दि.2) रोजी पोलीस पथकाने बारडगाव सुद्रिक येथून या चोरीतील आरोपीस ट्रकसहित ताब्यात घेतले. ही कामगिरी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)