चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद

आळेफाटा पोलिसांची कामगिरी

बेल्हे- चोरीच्या गुन्ह्यात असलेल्या दोन आरोपींना आळेफाटा पोलिसांना पकडण्यात यश आले असून त्यांच्याकडून दोन लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार दोघांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी सांगितले.

आळेफाटा पोलिसांनी सांगितले की, नगर-कल्याण महामार्गावर असलेल्या आळे गावच्या हद्दीत कमलाकर मताजी पानसरे (वय 59, रा.आळे, ता. जुन्नर) यांच्या मालकीच्या पिण्याचे पाणी पुरवाणाया माऊली ऍक्वा या दुकानाजवळ लावलेल्या डी. जे.च्या गाडीमधुन दोन हजार वॅटच्या सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या इलेक्‍ट्रॉनिक मशिन चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. याबाबत दि. 11 नोव्हेंबर 2018 रोजी आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, पोलीस उपनिरिक्षक आर. आर. गोंधे, पोलीस नाईक विकास लोंढे, पोलीस नाईक एन. आर. कारखिले, पोलीस कर्मचारी टी. टी. इस्टे, एच. आर. ढोबळे हे तपास करीत असताना त्यांना रखमा लक्ष्मण दुधवडे (वय 23)अविनाश नारायण जाधव ( वय 22 दोघेही रा माळवाडी,पळशी,ता.संगमनेर) हे दोघेजण चोरी केलेल्या मशिनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकला, त्या दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक केली. या चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकही हस्तगत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)