चोरीची कार विकण्याच्या तयारीत असणारे जेरबंद

पुणे – चोरीची कार विकण्याच्या तयारीत असणाऱ्यांना कारसह गुन्हेशाखेच्या युनिट तीनच्या पथकाने जेरबंद केले. त्यांना वाशी पोलिसांच्या ताब्यात सोपविण्यात आले आहे. गौरव नंदकुमार वाडकर (20, रा. कोपर खैरणे, नवी मुंबई), दीपक चंद्रकांत शेडगे (28, रा. कोपर खैरणे, नवी मुंबई) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

युनिट तीनमधील हवालदार महेबुब मोकाशी यांना मिळालेली माहिती अशी की, वारजे-माळवाडी येथे एक कार उभी असून ती स्वस्तात विक्रीसाठी दोन व्यक्ती गाडीत बसले आहेत. कारच्या नंबरची खात्री करता हा नंबर दुचाकीचा असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी जाऊन दोघाही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी दोन महिण्यांपूर्वी नवी मुंबई येथून बनावट चावीचा वापर करून गाडी चोरल्याचे निष्पन्न झाले.

या संदर्भात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून साडेपाच लाखाची गाडी हस्तगत करण्यात आली. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम, पोलीस उपनिरीक्षक अजय म्हेत्रे, संजय गायकवाड, सहायक पोलीस फौजदार किशोर शिंदे, पोलीस कर्मचारी मेहबुब मोकाशी, रामदास गोणते, शकील शेख, संदिप तळेकर, विल्सन डिसोझा यांच्या पथकाने केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)