पुसेसावळी : ना. नितीन बानुगडे-पाटील यांचा सत्कार करताना सुहास पिसाळ व ग्रामस्थ.

पुसेसावळी, दि. 11 (प्रतिनिधी)-सातारा सांगली शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख ना. नितीन बानुगडे- पाटील यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चोराडे ग्रामस्थांच्यावतीने व ग्रा. पं. ग्रा. पं. सदस्य सुहास पिसाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चोराडे गावच्या पोटपाटाच्या कॅनॉल संबंधित कामासाठी निधी मंजुर झाल्याबद्दल विशेष अभिनंदन करण्यात आले. यावेळी चोराडे गावच्या विविध विकासकामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी ना. बानुगडे-पाटील म्हणाले, की चोराडे गावच्या विकासासाठी विविध विकास योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील असुन सर्व प्रकारची मदत करण्यात येईल. यावेळी वर्धन ऍग्रोचे चेअरमन धैर्यशिल कदम, जेष्ठ मार्गदर्शक वसंतराव मोकाशी, कृष्णत पिसाळ, सुरेश मदने, महेंद्र पिसाळ, भास्कर जाधव, नितीन कुलकर्णी, नवनाथ पाटील व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)