चोराच्या चाकूहल्ल्याने एक जण जखमी

जेऊर मांडकी परिसरात भुरट्या चोरांचा धुमाकूळ

वाल्हे, दि. 19 (वार्ताहर)- मांडकी येथे घरफोडी करून अंधाराचा फायदा घेऊन आज (सोमवारी) पहाटेच्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करून भुरट्या चोरट्यांच्या टोळक्‍याने धुमाकूळ घातल्याची घटना जेऊर मांडकी परिसरात घडली. घटनेत जेऊर येथील एका व्यक्‍तीला भुरट्या चोराने चाकू हल्ला करून त्यास जखमी केल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जेऊर येथील भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागे माणिक दिनकर पवार यांच्या राहत्या घरी घुसून त्यांच्या पत्नी सुजाता पवार यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी माणिक पवार सावध झाल्याने त्यांनी चोरट्यास प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला यावेळी तब्बल एक तास या चोरास पवार यांनी पकडून ठेवले असता चोरट्याने त्यांच्या डोक्‍यावर चाकू मारून त्यांना जखमी केले. दरम्यान, चोरटा पळून गेल्याने पुढील अनर्थ टाळला. चोरट्यांनी मांडकी येथील कौशल्या नाना भोसले यांच्या राहत्या घरातून साड्या व रोख रक्कम लंपास केली तानाजी जगताप यांच्या हॉटेलचे कुलूप तोडून गल्ल्यातील चिल्लर, रोख रक्कम पळविली. गजानन दुर्गाडे यांचे कपडे तपासून त्यामधील काही पैसे मोबाईल चोरून नेल्या. हाच मोबाईल पुढे जेऊर चोरीत सापडला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. भुरट्या चोरांनी किरकोळ रकमेसह सामानाची चोरी केली. या प्रकारामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जेजूरी पोलीस ठाण्याची नाईट राउंडचे वाहन या भागात फिरकतच नसल्याने चोरट्यांचे फावले असल्याची चर्चा आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)