चोरांबे येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

चोरांबे ः विकासकामांचा शुभारंभ करताना सतीश बुद्धे शेजारी उपस्थित मान्यवर.

मेढा, दि. 4 (प्रतिनिधी) – जावळी तालुक्‍यातील चोरांबे येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला. माजी आमदार सदाभाऊ सपकाळ यांच्या प्रयत्नातून मौजे चोरांबे येथे स.पो.नि. जीवन माने गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या हस्ते या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
शिवसेनेचे माजी आमदार सदाभाऊ सपकाळ यांच्या अथक प्रयत्नातून 25/15 या योजनेतून विविध कामे मंजूर करण्यात आली. त्यामध्ये कमानीपासून श्री पद्मावती देवी मंदिरापर्यंत खडीकरण व डांबरीकरण, रस्त्याच्या दोनही बाजूने RCC नाले बांधणे, गावाअंतर्गत रस्त्यांना दोन्ही बाजूस आरसीसी साईडपट्टी, स्मशानभूमी सुशोभिकरण, जनसुविधाअंतर्गत चार लाखाचे शेड, 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत विहिरीचे मोटरघर व विहिरीवर जाळीचे झाकण बसविणे आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी चोरांबे गावचे सरपंच विजय बापू सपकाळ, सरपंच सौ कांताबाई ज्ञानदेव सपकाळ, राजू सपकाळ, शिवराम सपकाळ, विनोद सपकाळ, विष्णू सपकाळ, बजरंग सपकाळ, प्रकाश (बापू) सपकाळ, जयश्री सपकाळ, लक्ष्मी सपकाळ, रंजना सपकाळ, सुनीता सपकाळ, जनाबाई सपकाळ, भारती सपकाळ, रेश्‍मा सपकाळ तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)