चोरट्याकडून एकाला मारहाण

पिंपरी – चोरी करत असताना पकडणाऱ्या नागरिकाला चोरट्याने बेदम मारहाण केली आहे. राजेश टाले (वय-45, रा. जुनी सांगवी, पुणे) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश जुनी सांगवी मधील बाबुराव ढोरे भवन मध्ये तिसऱ्या मजल्यावर राहतात. त्यांच्या शेजारी होन्नप्पा तिम्मन्ना कोळी राहतात. रविवारी रात्री कोळी यांच्या घरी कोणीही नव्हते. त्यांचे घर कुलूप लावून बंद असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

चोरीच्या उद्देशाने हे तिघे आल्याचे लक्षात येताच शेजारी राहणाऱ्या राजेश यांनी तीन चोरांमधील दोघांना पकडले. त्यावेळी तिसऱ्या चोरट्याने राजेश यांना बेदम मारहाण केली. यानंतर तिघेही पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक अमित शेटे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)