चोरट्यांनी केले मंदिराला लक्ष्य!

राजगुरूनगर- चहोत आहे. कारण, काही दिवसांपूर्वी सातकरस्थळ, राजगुरूनगर येथील मंदिरात चोरी करण्यात आली होती. त्यातील आरोपी अद्यापही सापडलेले नाही तोच मंगळवारी (दि. 22) मध्यरात्री कडधे येथील खंडोबा मंदिरावर टाकलेल्या दरोडा पडल्याने चोरट्यांनी खेड तालुक्‍यातील मंदिरांना सध्या लक्ष केल्याचे आधोरेखीत झाले आहे. तर चोरट्यांचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.
कडधे येथील प्रसिद्ध असलेल्या खंडोबा मंदिरात मध्यरात्री चोरट्यांनी दरोडा टाकला. मंदिराच्या मुख्य दरवाज्याचे कुलुप तोडून आतमध्ये प्रवेश करून मंदिरातील दानपेटी उचलून मंदिराच्या मागच्या बाजुला घेऊन जाऊन दानपेटी फोडली व दानपेटीतील रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे आता मंदिरेही सुरक्षित नसल्याचे अधोरेखित होत आहे. चोरांनी आता घरफोडीबरोबर मंदिरांना लक्ष केल्याने भाविकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.

  • या आधीच्या चोरीचा तपास नाही
    महिनाभरात सातकरस्थळ गावात पाटलाच्याच घराला कुलुप लावुन गावातील घरांमध्ये चोरट्यानी चोरी करीत येथील भैरवनाथ मंदिरात चोरी केली होती. त्यानंतर राजगुरुनगर जवळील प्रसिद्ध तुकाईमाता मंदिरात कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून देवीच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली होती. या दोन्ही घटनेतील आरोपींचा अद्यापही शोध लागला नसताना आज पुन्हा खंडोबा मंदिराला लक्ष करुन चोरी करण्यात आली आहे.
  • तिसऱ्या डोळ्याची नजर गरजेची
    मंदिरासह गावावर तिसऱ्या डोळ्याची नजर रहावी यासाठी मंदिरासह गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी अनेक दिवसांपासून कडधे परिसरात होत आहे मात्र, सीसीटीव्ही बसविण्याकडे ग्रामस्थांचे दुर्लक्ष होत असल्याने चोरांचे फावते आहे.
  • राज्यातील असंख्य नागरिकांचे कुलदैवत असणाऱ्या कडधे येथील श्री खंडोबा मंदीरात दर्शनासाठी रोज हजारो भक्त येत असतात. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दान पेटीत हजारो रुपये टाकले जातात. मंदिराची आणि भाविकांची सुरक्षा देवस्थान ट्रस्टकडून ठेवली जाते. तसेच मंदिरात सीसीटीव्ही लावण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील मंदिरात चोरी करणाऱ्या चोरांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
    – चेतन चव्हाण, सदस्य, कडधे ग्रामपंचायत

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)