चोरट्यांकडून 20 दुचाकी जप्त

पुणे,दि.6 -वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या दोघांनी दुचाकी चोरीचे 20 गुन्हे कबूल केले आहे. त्यांच्याकडून 6 लाख 10 हजार रुपये किंमतीची ही वाहने जप्त करण्यात आली आहे. त्यातील 2 दुचाकी नाशिक, संगमनेर येथील 3 आणि ओतूरमधील तीन दुचाकी आहेत. तर उर्वरीत 10 वाहने कोणत्या ठिकाणाहून चोरली याचा पोलीस तपास करीत आहेत.
अभिषेक उर्फ पांडु अरुण जगधने (19 ) आणि वैभव उर्फ पप्पू रामभाऊ शिंदे (22 , दोघेही रा. घामणगांव पाट, ता. अकोले, जि. अहमदनगर) यांना बुधवारी ( 3 ऑक्‍टोंबर) खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती. न्यायालयाने त्यांची 6 ऑक्‍टोंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली होती. या काळात अभिषेक याच्या घरून या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत 6 लाख 10 हजार रुपये आहे. दुचाकी चोरांकडून मोठ्या प्रमाणात वाहने हस्तगत करण्याची ही महिण्यातील दुसरी घटना आहे.
शहरातील दुचाकी वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा म्हणुन वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेनुसार खंडणी विरोधी पथकाचे (गुन्हे शाखा) प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी कर्मचा-यांना सुचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांच्याकडील अधिकारी व कर्मचारी हे पुणे शहरात गस्त घालीत असताना, पोलीस कर्मचारी प्रकाश मगर व मंगेश पवार यांना त्यांच्या बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, वैभव शिंदे व अभिषेक जगधने यांनी सुमारे 2 ते 3 वषार्पासून नाशिक, संगमनेर, ओतूर आणि पुण्यातून मोठ्या प्रमाणात बजाज पल्सर, हिरो होन्डा पेंशन प्रो, हिरो होन्डा स्प्लेंडर व हिरो डिलक्‍स ही दुचाकी वाहने चोरली आहेत. दोघेही आणखी दुचाकी चोरण्यासाठी ताडीवाला रस्ता ते ससून हॉस्पीटल येथे आलेले आहेत. ही खबर मिळाताच पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी 2 पथके तयार केली होती. त्यातील एका पथकाला दोन्ही आरोपींना पकडण्यात यश आले.
संगमनेर, नाशिक, ओतूर आणि पुणे शहरातून ज्या व्यक्तींच्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत, त्यांनी खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे, पोलीस कर्मचारी प्रमोद मगर, धिरज भोर, फिरोज बागवान, महेश कदम, मनोज शिंदे, प्रदीप शिंदे, शिवानंद बोले, संतोष मते, नारायण बनकर यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)