चोखी ढाणी येथे साऊंड सिस्टिम चोरणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात

वाघोली – विविध जिल्ह्यामध्ये दरोड्याचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराला पाठलाग करून पकडण्यात लोणीकंद पोलिसांना यश आले आहे. त्याचप्रमाणे नऊ महिन्यापूर्वी चोखी ढाणी येथून सव्वाचार लाखांचे साऊंड सिस्टीम चोरून नेणाऱ्या तिघांना देखील सापळा रचून लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.

गणेश ऊर्फ लहू ऊर्फ करण रामभाऊ चव्हाण (रा. डोंगमळा, जिंतूर, परभणी) असे पाठलाग करून पकडण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे, तर लतेश दिलीप पतंगे, विजय बाळासाहेब कोळी, तन्वीर अब्बास पठाण (तिघेहि रा. वाघोली, पुणे) यांना साऊंड चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश चव्हाण हा लोणीकंद येथे सासुरवाडीला येणार असल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली होती. सापळा रचून त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र तो चकवा देऊन बाजरी व उसाच्या शेतात शिरला होता. त्याचा पाठलाग केला असता तो शेतामध्ये दबा धरून बसला असताना पोलीसांना सापडला. त्याच्यावर चोरी, दरोडा, घरफोडीचे गंभीर गुन्हे सातारा, अहमदनगर, जालना, बीड, रायगड, माझलगाव येथे दाखल आहेत. जेरबंद केल्यानंतर सखोल चौकशी केली असता बकोरी येथे चव्हाण याने दुकान फोडून साडेपाच हजार लंपास केल्याचे कबूल केले आहे.

त्याचप्रमाणे चोखी ढाणी येथील व्हिजन क्रस्टल लॉनवरील सव्वाचार लाखांचे चोरलेले साऊंड सिस्टिम विक्री व खरेदीसाठी तिघेजण येणार असल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पतंगे, कोळी, पठाण यांना सापळा रचून अटक करण्यात आली. साऊंड सिस्टिम पोलिसांनी हस्तगत केले आहे. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)