चॉकलेटच्या बहाण्याने सोन्याची चेन पळविली

नगर – तारकपूर येथे चॉकलेट व गोळ्या घेण्याच्या बहाण्याने 65 वर्षीय व्यापाऱ्याच्या गळ्यातील सोन्याची चेन पळविल्याच्या घटनेने तारकपूर परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती अशी की, तारकपूर येथे व्यापारी कमलेश मोहरीलाल कंत्रोड यांचे किशोर किराण्याचे दुकान आहे.

गुरूवारी दुपारी 1 च्या सुमारास मोटारसायकल वरून दोन अनोळखी चोरांनी त्यांच्या दुकानातून चॉकलेट, गोळ्या विकत घेत, दुकानासमोर थोड्यावेळ थांबत पुन्हा लेमन गोळ्याची मागणी केली. कंत्रोड यांनी लेमनच्या गोळ्या दिल्यावर कंत्रोड हे पैसे घेण्यासाठी पुढे झुकले असता त्यांच्या गळ्यातील 5 तोळ्याची सोन्याची चेन दोन चोरट्यांनी हिसकावून तेथून पोबारा केला. याबाबत कंत्रोड यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक तेथे आले. पंरतु त्यापूर्वीच चोर तेथून पसार झाले होते. याप्रकरणी कंत्रोड यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी अज्ञात चोराविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)