चैत्रयात्रेला आई एकविरादेवी दर्शनासाठी कार्ला गडावर गर्दी

कार्ला, (वार्ताहर) – असंख्य कोळी, आगरी, भाविकांसह महाराष्ट्रातील जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या वेहरगाव-कार्ला एकविरा देवीच्या चैत्र यात्रेला शुक्रवारी (दि. 23) देवीचे माहेरघर, देवघर येथील काळभैरवनाथ देवाच्या पालखीने सुरवात झाली. शनिवारी (दि. 24) कार्ला एकविरा गडावर सायंकाळी सहा वाजता देवीची माजी आमदार व देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे यांच्या हस्ते आरती व पालखीचे विधिविहित पूजन करुन मोठ्या उत्साहात गडावर मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण परिसर आई एकविरा आईचा उदो उदो करत संपूर्ण एकविरा गड दुमुदुमुन गेला होता.

या यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या देवीची पालखी व पालखीची मिरवणूक या पालखीचे दर्शन घेण्यासाठी व पालखीची मिरवणूक पाहण्यासाठी कोकणसह, मुंबई, ठाणे, रायगडसह महाराष्ट्रातील लाखो भाविक या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी आले असल्याने मोठी गर्दी झाली होती.

एकविरा देवी ही कोळी व आग्री बांधवांची कुलदैवत असल्याने कोकण भागातून अनेक पालख्या याठिकाणी आल्या होत्या त्या सर्व पालख्यांचे स्वागत एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अंनत तरे यांनी गुलाबपुष्प देऊन केले.
यात्रेसाठी भाविकांना देवीचे सुलभतेने दर्शन व्हावे व भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी देवस्थानाच्या वतीने आवश्‍यक त्या सुविधा पुरवल्या गेल्या होत्या. यात्राकाळात दारुबंदी असल्याने पोलीस दलाच्या वतीने वाहनांची तपासणी करत होते. वेहरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच दत्तात्रय पडवळ, उपसरपंच सचिन येवले यांच्या वतीने भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करुण देण्यात आल्या होत्या.

पोलीस प्रशासनाच्या वतीने पूर्ण गड ते कार्ला फाटापर्यंत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रांतआधिकारी सुभाष भागडे, पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक सुयेझ हक, तहसिलदार रणजीत देसाई, पोलीस उपविभागीय ज्ञानेश्‍वर शिवथरे, पोलीस निरिक्षक रामदास इंगवले, चंद्रकांत जाधव, प्रदिप काळे, सहाय्यक निरिक्षक बालाजी गायकवाड, शितोळे यांच्यासह सर्व प्रशासन अधिकारी स्वत: गडावर व गड परिससरात फिरुन यात्रेकरूच्यां सोयीसुविधा कायदा व्यवस्थाची पाहणी करत होते.

यात्रा काळामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे, मदन भोई, विजय देशमूख,विलास कुटे, संजय गोविलकर, नवनाथ देशमुख, काळूराम देशमूख,पार्वताबाई पडवळ आदीनीं गडावर नियोजन केले होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)